मतदानासाठी तरुणांनाही लाजवेल असा वृद्धांचा उत्साह

| सुधागड-पाली | वार्ताहर |

विधानसभा निवडणुकीत मतदारांमध्ये तरुणांनाही लाजवेल असा उत्साह सुधागड तालुक्यात ज्येष्ठांमध्ये पाहायला मिळाला. अनेक ज्येष्ठांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. व लोकशाही सदृढ व समृद्ध करण्यासाठी आपले मोठे योगदान दिले.

शरीर साथ देत नसताना देखील अनेक वृद्धांनी मतदानासाठी मतदान केंद्र गाठले आणि आपला मताधिकार बजावला. नवमतदार व तरुण यांनी देखील मतदानासाठी गर्दी केली होती. मात्र ज्येष्ठांनी मतदानासाठी दाखवलेला हा पुढाकार आणि या परिस्थितीत देखील ते मतदानासाठी बाहेर पडले होते, ही बाब सगळ्यांसाठीच आदर्श अशी होती. काही ठिकाणी ज्येष्ठांनी आपल्या बोटाची शाई दाखवत फोटो देखील काढले. मतदान केंद्रावर वृद्धांसाठी वेगळी रांग होती आणि त्यांना मतदानासाठी पुढे घेतले जात होते. मतदान केंद्रामध्ये वृद्धांना बसण्यासाठी खुर्ची व बाकड्याची व्यवस्था देखील केली होती.

आपले एक मत देशाचे भविष्य घडवू शकते. मताधिकार बजावल्यावरच आपण विकासाबाबत, आपल्या हक्क व अधिकाराबाबत खंबीरपणे बोलू शकतो. चांगले सरकार निवडून देण्यासाठी आपले एक मत खूप काही करू शकते म्हणून निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतो.

तिजाबाई मुलचंद ओसवाल,
वय 96, जेष्ठ महिला
Exit mobile version