विविध मागण्यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर; सामोपचाराने प्रश्न सोडावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
। रायगड । प्रतिनिधी ।
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराठी येथे मराठा आरक्षण आणि अन्य प्रलंबित मागणीसाठी सुरु असलेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सकाळ मराठा परिवार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. सामोपचाराने प्रश्न सोडवा अन्यथा अनोळणाची दिशा अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
स्वहक्कासाठी अतिशय शांततापूर्ण पद्धतीने मराठा समाज अनेक आंदोलने आणि मोर्चे काढत आला आहे. एवढे लाखो ने मोर्चे निघाले तरी एक अनुचित घटना कुठे घडल्याचे एकिवात नाही किंवा त्याची नोंद नाही. असे असताना आंदोलन सामोपचाराने थांबविण्याच्या जागी पोलिसांनी फौजफाटा आणून आंदोलकांवर लाठी हल्ला केला. यासाठीची पूर्व तयारी पोलिसांनी केली होती. झालेला लाठीहल्ला आदेशाशिवाय होऊ शकत नाही. लाठी हल्ला करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून तातडीने निलंबित करण्यात यावे अशी मागणी सकल मराठा परिवार संघटनेने केली आहे.
मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनादरम्यान अनेक मराठा लोकांवर अमानुष आणि कठोर कलमे लावून गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्व गुन्हे सरसकट रद्द केले जावे अशा सर्व तरुणांना निर्दोष मुक्त करावे. आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढण्यात यावा. कोपर्डीमध्ये ज्या भगिनीवर अत्याचार झाला तिला न्याय मिळाला नसून तिला न्याय मिळावा प्रशासनात मराठा विरोधी अधिकाऱ्यांची लॉबी तयार झाली आहे, तिला मराठा समाजाच्या प्रश्नांवर काम करण्यास बंदी घालावी. अशा मागण्यांचे निवेदन सकाळ मराठा परिवाराने जिल्हा प्रशासनाला दिले आहे. नायब तहसीलदार मनोज गोतारणे यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी सागर सोंडकर, सोमनाथ काळभोर, विशाल आढाव, सुनील रांजणे, भीमराव रांजणे, अमोल भिकुले, विनोद शिळीमकर, विशाल कदम ,विपुल जगदाळे राहुल शिळीमकर, पद्माकर शिळीमकर, किरण सणस, अर्जुन काळे, बिभिशन जेधे, सुप्रिया जेधे, शंकर माने ,गणेश घोरे ,नवनाथ फदाले ,संतोष यमगर सचिन सोंडकर, सागर सोंडकर इत्यादी उपस्थित होते.