नेरळचे वातावरण आल्हाददायक; शिवाली परब

| नेरळ | प्रतिनिधी |
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगराचा विस्तार नेरळ आणि कर्जतपर्यंत वाढला आहे. त्यात माथेरानसारख्या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाच्या पायथ्याशी असलेले नेरळ परिसराचा हा प्रदूषणमुक्त परिसर त्यामुळे या आल्हाददायक वातावरणात मी स्वतः हरपून गेले आहे आणि त्यामुळे आपल्या सहकार्‍यांना नेरळमध्ये घर घेण्यासाठी आणणार, असा शब्द हास्य अभिनेत्री शिवाली परब उपस्थित होत्या. नेरळ येथील हावरे मिडोज या गृहप्रकल्पाच्या लोकार्पणप्रसंगी त्या बोलत होत्या.

हावरे बिल्डर्स कडून नेरळजवळ एक गृहप्रकल्प साकारला गेला असून, या प्रकल्पाच्या लोकार्पणप्रसंगी हास्य अभिनेत्री परब या उपस्थितीत होत्या. त्यावेळी बोलताना शिवाली परब यांनी नेरळ परिसराचे कौतुक केले. नेरळ मेला निमित्त आयोजित सोहळ्यात हावरे मिडोज प्रकलपाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी त्या गृह प्रकल्पातील कुटुंबांना चावी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी हावरे बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत हावरे, हावरे बिल्डर्सचे चेअरमन हावरे तर प्रमुख पाहुणे म्हणून एसबीआय बँक आणि स्वामीह फंडचे मुख्य गुंतवणूक अधिकारी इरफान काझी, प्रमुख गुंतवणूक अधिकारी निखिल केजरीवाल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवाली परब आणि अनिकेत हावरे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

Exit mobile version