बांगलादेशातील घडामोडीचा फटका बंगाली नागरिकांना

। पनवेल ग्रामीण । वार्ताहर ।

बांगलादेशात घडत असलेल्या राजकीय घडामोडीमुळे वातावरण तापले आहे. बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचे पडसाद भारतात उमटू लागले आहेत. याचा फटका देशातील पश्‍चिम बंगाल राज्यातून महराष्ट्रात नोकरी धंदा करण्यासाठी आलेल्या बंगाली भाषिक नागरिकांना बसत असून, सर्वच बंगाली भाषीकांकडे बांगलादेशी असल्याच्या नजरेने पाहिले जात आहे. देशातील इतर राज्यातून महाराष्ट्रात नोकरी धंद्या निमित्त येणार्‍यानमध्ये पश्‍चिम बंगाल मधून येणार्‍या बंगाली भाषिक नागरिकांची संख्या मोठी आहे. मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करणारे हे नागरिक वेळ प्रसंगी पडेल ते काम करत असल्याने विविध क्षेत्रात बंगाली भाषिक नागरिकांनी आपली मक्तेदारी निर्माण केली आहे. नवी मुंबई परिसरात घरकाम करणार्‍या महिलांमध्ये बंगाली भाषिक महिलांची टक्केवारी जास्त आहे. त्याच सोबत परिसरात असलेल्या लेडीज बारमध्ये तसेच देह विक्रीचा व्यवसाय करणार्‍यानमध्ये बंगाली भाषिक महिलांची संख्या मोठी आहे. त्याच बरोबर फेरीवाला व्यवसाय तसेच पदपथावर केल्या जाणार्‍या व्यवसायामध्ये बंगाली भाषिक नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. सध्याच्या घडीला बांगलादेशात अल्पसंख्याक समूहावर बहुसंख्य असलेल्या समुदायाकडून करण्यात येत असलेल्या अत्याचारामुळे भारतातील बंगाली भाषिक नागरिकांना बांगलादेशी म्हणून टार्गेट करण्यात येत असल्याने बंगाली भाषिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मागील 10 वर्षापासून मी नवी मुंबई परिसरात फळ विक्रीचा व्यवसाय करत आहे. मी मुळचा पश्‍चिम बंगाल राज्यातील असून, हिंदू धर्मीय आहे.मला या पूर्वी व्यवसाय करताना कोणतीही अडचण आली न्हवती. पण बांगलादेशात उद्भवलेल्या परस्थिती मुळे अलीकडच्या काळात मला अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे.

सुमेध सरकार
फळ विक्रेता

बंगाली भाषिक असल्याचे कारण पुढे करून सध्या आमच्या व्यवसायावर कारवाई केली जात आहे.भारतीय असूनही आमच्या विरोधात केल्या जात असलेल्या या कारवाईमुळे आमच्या परिवाराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

इम्रान खान
फळ व्यावसायिक

Exit mobile version