| रोहा | प्रतिनिधी ।
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्यावतीने आयोजित केंद्रस्तरीय अधिकारी-कर्मचारी क्रीडा स्पर्धा 2026 ला रोहा तालुक्यातील सानेगाव येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत उत्साहात सुरुवात झाली. प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धांमध्ये बुद्धिबळ, क्रिकेट, कॅरम, कबड्डी, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, हँडबॉल, धावणे, गोळा फेक व भाला फेक अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता. या प्रसंगी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सौरभ बोबडे, मुख्याध्यापिका विजय पाटील, मुख्याध्यापक एम. एम. खामकर, अधीक्षक कैलास पठारे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना, शिस्त व आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचा उत्साह
