प्रसिद्ध कृष्णा दुखापतग्रस्त

| मुंबई | वृत्तसंस्था |

भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्याच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दुखापतग्रस्त झाला आहे. 27 वर्षाच्या प्रसिद्ध कृष्णाने नुकतेच दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्वस केलं होत. कर्नाटक-गुजरात सामन्यादरम्यान त्याच्या मांडीचा स्नायू दुखवला. त्यामुळे त्याला इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी मुकावे लागले आहे. कृष्णाला वगळण्याचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रसिद्धच्या दुखापतीची वेळ अधिक वाईट असू शकत नाही. दुखापतीमुळे मोहम्मद शमी आधीच संघाबाहेर गेल्यामुळे भारताच्या वेगवान माऱ्याची धार कमी झाली आहे. कृष्णाच्या अनुपस्थितीमुळे लाइनअप आणखी कमकुवत होईल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि आवेश खान यांच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी आली आहे.

Exit mobile version