आईस्क्रीममध्ये सापडलेले बोट कर्मचाऱ्याचे

डीएनए टेस्टमध्ये झाले निष्पन्न

। मुंबई । वृत्तसंस्था ।

काही दिवसांपूर्वी मुंबई येथे एका डॉक्टर महिलेने ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये चक्क बोटाचा तुकडा सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर महिलेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सापडलेले बोट फॉरेन्सिक लॅबमध्ये तापासणीसाठी पाठविले होते. चौकशीदरम्यान आईस्क्रीममध्ये आढळलेले बोट कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ऑनलाइन मागवलेली आईस्क्रीम पुण्याच्या फॅक्टरीत तयार करण्यात आली होती. जवळपास महिन्याभरापूर्वी आईस्क्रीम पॅकिंग करताना एका कर्मचाऱ्याचा अपघात झाला होता. अपघातात कर्मचाऱ्याने उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा भाग गमावला होता. त्यामुळे कर्मचाऱ्याची डीएनए चाचणी करण्यात आली. आईस्क्रीमध्ये सापडलेल्या मानवी बोटाच्या डीएनएशी त्याचे डिएनए मॅच होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version