कचरा डेपोला आग

| रसायनी । वार्ताहर ।

वासांबे मोहोपाडा क्षेत्रात शिंदीवाडीजवळ कचरा डेपोला मंगळवारी आग लागली. स्थानिकांना धुराचा त्रास होऊ लागल्याने तातडीने एमआयडीसी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन पथक, ग्रामपंचायत कर्मचार्यांनी आग आटोक्यात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

मोहोपाडालगतच्या गावातील कचरा गोळा करून शिंदीवाडीजवळील डोंगराच्या बाजूला टाकण्यात येतो. त्यामुळे याठिकाणी कचर्याचे ढीग तयार झाले आहेत. मंगळवारी कचर्‍याला आग लागली. सायंकाळी आगीचे लोट आणि कचर्‍यामुळे मोहोपाडा, नवीन पोसरी गावांत सर्वत्र धूर पसरल्याने स्थानिकांना त्रास होऊ लागला. हवेत धुरक्याची चादर तयार झाल्याने शिवनगर व गणेशनगरमधील ग्रामस्थांना खोकला, डोळे जळजळणे, श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला. ग्रामपंचायतीने अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझवली. दरम्यान ग्रामपंचायतीने कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावावी, त्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय खारकर व स्थानिकांनी केली आहे.

Exit mobile version