भारत-न्यूझीलंड पहील्या कसोटीचा पहिला दिवसाचा खेळ अखेर रद्द

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचे दोन सत्र पावसामुळे वाया गेले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत 2-0 असा दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ घरचं मैदान पुन्हा गाजवण्यासाठी तयार झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत टीम इंडियाचा आक्रमक पवित्रा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण, पावसामुळे चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फिरवले आहे. दोन सत्र वाया गेल्यानंतर कव्हर्स हटवण्यात आले होते. पाऊस आता विश्रांती घेतोय असे चिन्ह दिसत असताना वरुण राजा पुन्हा बरसले. त्यामुळे अखेरीस आजच्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला गेला. 1955 ते 2021 या कालावधीत घरच्या मैदानावर यांच्यात झालेल्या 36 कसोटीत भारताने 17 जिंकल्या आहेत, तर 2 गमावल्या आहेत. 17 कसोटी ड्रॉ राहिल्या आहेत. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार उद्याचा खेळ लवकर सुरू होणार आहे. सकाळी 8.45 वाजता नाणेफेक होईल, तर 9.15 वाजता दुसर्‍या दिवसाचा खेळ सुरू होईल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे.

Exit mobile version