देशात पहिल्या टप्प्यातील मतदान पार
| मुंबई | प्रतिनिधी |
अठराव्या लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याच्या मतदानाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील 5 जागांसह देशभरातील 102 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर आणि भंडारा-गोंदिया या मतदारसंघात मतदान या पाच मतदारसंघात निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळाली. नक्षलग्रस्त भागामध्ये मतदान प्रक्रियेत कोणतीही बाधा येऊ नये म्हणून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. लोकसभेसह अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभेसेच्या 92 जागांसाठीही आज मतदान पार पडले.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात नऊ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालांचे भवितव्य पणाला लागले आहे. सकाळी 7 वाजता सुरू झालेलेे मतदान सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होते. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात 54.85 टक्के इतके मतदान झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 16.63 कोटहूिन अधिक मतदान आहेत. यामध्ये 8.4 कोटी पुरुष आणि 8.23 कोटी महिला मतदार आहेत. त्यापैकी 35.67 लाख नवमतदार असून, त्यांनी पहिल्यांदाज मतदान केले आहे. तर, 20 ते 29 वयोगटातील मतदारांची सख्या 3.51 कोटी आहे.
मतदानाासाठी जनजागृती भारतीय लोकशाहीच्या भवितव्यासाठी संविधानाने दिलेला सर्वात महत्त्वाचा हक्क बजावण्याची संधी पुन्हा एकदा मतदारांकडे आहे. त्यामुळे कुठलीही टाळाटाळ न करता मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी शासकीय स्तरावर किंवा इतर विविध संस्थांतर्फे जनजागृती करण्यात आली आहे. मतदानाचा टक्का वाढवा यासाठी प्रशासनाने मतदानप्रक्रियेची पूर्ण तयारी केली असून, सुरक्षेच्या अनुषंगाने कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. सोबतच नागपुरात आठ विशेष मतदान केंद्रही उभारण्यात आले होते. एकुणात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सर्व स्तरावरच्या यंत्रणा कामाला लागल्याचे दिसून आले.