। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातील राजकीय सत्ता संघर्ष टोकाला पोहोचला असून शिवसेना आणि बंडखोर यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गुवाहाटी येथे तळ ठोकून असलेले बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाची पहिली पत्रकार परिषद आज दुपारी 2 वाजता होणार आहे. यामध्ये ते काय भूमिका जाहीर करतात याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गट एक शिष्टमंडळाची स्थापना करणार असून संभाव्य राजकीय स्थितीसंदर्भात अन्य पक्षांशी चर्चा करणार आहेत.