आयपीएलचा फॉरमॅट बदलणार

। मुंबई । वृत्तसंस्था ।
इंडियन प्रीमियर लीग 2021 स्पर्धेचा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यापूर्वीच आयपीएलचा पुढचा सिझन सध्या चर्चेत आहे. कारण, पुढच्या सिझनपासून ही स्पर्धा पूर्ण बदलणार आहे. आयपीएल 2022 मध्ये 8 नाही तर 10 टीम खेळणार आहेत. दोन नव्या टीमसाठी बीसीसीआयने एक टेंडर जारी केले आहे. त्यामध्ये या टीमची बेस प्राईज देखील निश्‍चित केली आहे.

6 शहरे या 2 जागेसाठी दावेदार आहेत. आयपीएल 2022 ही स्पर्धा नव्या प्रकारात होणार आहे. सध्याच्या फॉरमॅटमध्ये ही स्पर्धा झाली तर एकूण 94 मॅच होतील. त्यामुळे 2011 च्या फॉरमॅटमध्ये ही स्पर्धा होईल. 2011 साली देखील आयपीएलमध्ये 10 टीम खेळल्या होत्या. पुढील आयपीएलमध्ये 70 लीग आणि 4 प्ले ऑफ अशा एकूण 74 मॅच होतील. बीसीसीआयने आयपीएल 2022 च्या नव्या टिमचे टेंडर जारी केले आहे. एक दावेदार एकाच टीमसाठी टेंडर करु शकेल. या टेंडरसाठीचा फॉर्म 10 लाख रूपयांचा आहे. बीसीसीआय कोणतेही कारण न देता हा फॉर्म फेटाळू शकते. मीडिया रिपोर्टनुसार नव्या 2 टीमसाठी 6 शहरे शर्यतीमध्ये आहेत. अहमदाबाद आणि लखनौसह कटक आणि गुवाहटी शहरांच्या टीमसाठीही बोली लावली जाऊ शकते.

आजवरच्या आयपीएल इतिहासात सर्वात महाग टीम पुणे वॉरियर्स इंडिया होती. जी 2010 साली 333. 2 मिलियन डॉलरमध्ये खरेदी करण्यात आली होती. तर राजस्थान रॉयल्स सर्वात कमी 67 मिलिअन डॉलरमध्ये खरेदी करण्यात आली होती.

Exit mobile version