माजी आ. ना.का.भगत यांचा जन्मशताब्दी समारंभ

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
माजी आ. ना. का . भगत यांचा जन्मशताब्दी सामारंभ सोमवारी (दि. 16) अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या समारंभास सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नींचा सत्कार करण्यात आला. सारळ येथील सत्यवती पांडूरंग कवळे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून सत्कार स्वीकारला. 80 वर्षांवरील 40 ज्येष्ठ काँग्रेस जनांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

या समारंभात प्रमुखपाहुणे म्हणून बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, अशा कार्यक्रमांमुळे स्वातंत्र्य लढ्यात कुणाचा सहभाग होता हे लोकांना समजेल. ना. का. भगत हे स्वातंत्र्य सैनिक होते. या कार्यक्रमामुळे त्यांच्या कार्याची माहिती तरूण पिढीला होईल.

आमदार रवी पाटील, माजी आमदार मुश्ताक अंतुले, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांची भाषणे झाली. आमदार जयंत पाटील यांचा संदेश वाचण्यात आला. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकापचे रायगड जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष आर.सी. घरत, माजी विभागीय आयुक्त जी. टी. बंदरी, महिला काँग्रस रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. श्रध्दा ठाकूर, काँग्रेसचे प्रदेश सचीव अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, काँग्रेसचे अलिबाग तालुका अध्यक्ष योगेश मगर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी, ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर आदी यावेळी उपस्थित होते. अ‍ॅड. जे. टी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुकुमार भगत यांनी आभारप्रदर्शन केले. प्रतिम सुतार यांनी सुत्रसंचालन केले.

Exit mobile version