आगामी निवडणुका शेकाप स्वबळावर लढणार ; शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांची घोषणा

खोपोलीत शेकाप पक्षप्रवेश सोहळा
खोपोली | वार्ताहर |
देशात पुरोगामी विचार असावा आणि भाजपलाा विरोध करण्यासाठी आम्ही महाआघाडीत आहोत मात्र पुढील निवडणुका आघाडीत लढायच्या का, स्वबळावर याची चर्चा कार्यकर्त्यांशी करून निर्णय घेतला जाईल,अशी घोषणा शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी खोपोलीत केली.रविवारी येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.यावेळी त्यांनी शेकापची सत्ता नसतानाही पडत्या काळात पक्षात प्रवेश करणार्‍यांचे स्वागतही केले.

खोपोली नगरपरिषदेत दहा नगरसेवक असतानाही मागील निवडणुकीत कमी जागांंवर निवडणूक लढवली. शेकापच्या मतांमुळेच खोपोलीच्या नगराध्यक्षा अल्पमतात निवडून आल्या. परंतु सत्ताधारी ज्या पध्दतीने वागणूक आणि धोरण ठरवतात चुकीची असून त्यामुळेच शहरात विकासकामे झालीच नाही.
आ.जयंत पाटील,शेकाप सरचिटणीस

खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रविण गायकवाड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शेकाप कार्यप्रणालीवर विश्‍वास ठेवत आ.जयंत पाटील यांच्या उपस्थितीत खालची खोपोली येथे कमलाबेन सभागृहात आयोजित कार्यक्रमात जाहीर पक्षप्रवेश केला आहे.यावेळी व्यासपीठावर जिल्हा सहचिटणीस किशोर पाटील, ज्येष्ठ नेते संतोष जंगम, तालुका चिटणीस संदीप पाटील, शहर चिटणीस अविनाश तावडे,नगरसेवक दिलीप जाधव, माजी उपनगराध्यक्ष अरूण पुरी, ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम कांबळे, कैलास गायकवाड, रविंद्र रोकडे, अ‍ॅड.रामदास पाटील,माजी नगरसेवक संजय पाटील,आनंद नायडू, खजिनदार जयंत पाठक, दिनेश गुरव,राजू अभाणी, हानिफ दुदुके, मनोज माने यांच्यासह शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आम.जयंत पाटील म्हणाले की,खोपोली नगरपालिका अ गटातील असून उत्पन्नही चांगला असताना ज्या पध्दतीने फंडीग आणि विकास करायला हवा होता तो झालेला नाही. अलिबाग नगरपालिका आणि खालापूर नगरपंचायत शेकापक्षाच्या ताब्यात असून कोणतीही पाणीपट्टी,घरपट्टीत वाढ केलेली नाही, अतिक्रमण हाटविताना वाद कोर्टात न नेता समोमचाराने मिटवून रस्ते वाढविले असल्याचे उदाहरण दिले. खोपोली शहरात दलित आणि आंबेडकरवादी समाज मोठ्या प्रमाणात आहे. ते एकत्रित नाही हे दुर्दैव आहे. जे प्रस्तापित होतात ते समाजाला विसरतात अशी खंत आ.पाटील यांनी व्यक्त केली.

खोपोली शहरातील लोकांनी व्यक्तिगत प्रेम केले असून दहा ते बारा वर्षापूर्वी आम्ही संघटन केले होते. त्यावेळेस आता असणारे लोक असते तर नगरपालिकेच्या निवडणुकीत चित्र बदलला आले असते,असा दावाही त्यांनी केला. छत्तीशी विभागातील शेतकर्‍यांच्या पाठिशी शेकाप खंबीरपणे उभा असल्यामुळे एक कोटी भाव मिळणार आहे, केटीएस कर्जामुळे बंद पडणार होती साडेचार कोटी कर्ज काढून शिक्षण संस्था चालू ठेवत सर्व पक्षीय आणि व्यापारी सदस्य म्हणून काम करीत आहे.कोरोना काळात दहा लाखाचे वैद्यकीय साहित्य खोपोलीसाठी उपलब्ध करून दिले. शेकापक्षाकडे व्हिजन असून शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो असा विश्‍वासही आ.जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Exit mobile version