उरणच्या तरुणांचे भविष्य अंधारात

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| उरण | प्रतिनिधी |

उरणच्या उच्चशिक्षित तरुणांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर उद्योगधंदा सुरू करावा, रोजगार निर्माण करावा अशी स्वप्ने रंगवली. मात्र, शासनाच्या अन्यायकारक धोरणामुळे ही स्वप्ने धुळीस मिळत आहेत. शासनाच्या ड्रीम प्रोजेक्ट तिसरी मुंबईसाठी मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण ज्यांनी जमीन अद्याप दिलेली नाही, त्यांना स्वतःच्या जमिनीवर उद्योग सुरू करायचा झाला, तरी सर्वात महत्त्वाची एमएमआरडीएची एनओसीच दिली जात नाही. जमीन बिनशेती करण्याची परवानगी नाकारल्याने स्थानिक तरुणांच्या उद्योजकतेचे भविष्य संपवले जात आहे.

दरम्यान, शासनाने जमिनींचा भाव किती देणार, शेतकऱ्यांना पुनर्वसन पॅकेज काय मिळणार, याबाबत कोणतेही स्पष्ट धोरण मांडलेले नाही. परंतु, प्रत्यक्षात दलाल मात्र मोठ्या प्रमाणावर गावे पिंजून काढत असून, स्थानिकांच्या जमिनी खरेदी करत फिरत आहेत. आम्ही शिक्षण घेऊन उद्योजक होण्याची स्वप्ने पाहिली. पण सरकारच्या अडथळ्यांमुळे आम्हाला कायमचे मजूरच राहावे लागणार का? आमचं भविष्य उद्योगात नाही तर दलालांच्या पायघड्यांत आहे का? असा संतप्त सवाल उरणमधील युवकांनी केला आहे. सरकारच्या या अन्यायकारक भूमिकेमुळे तरुणाईतील असंतोष उफाळून आला असून, हा प्रश्न आता रस्त्यावर झगडा पेटवणारा ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Exit mobile version