उरणमध्ये विजेचा खेळखंडोबा सुरूच

। उरण । वार्ताहर ।

उरण परीसरात पावासाळा सुरु होताच विजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. यामुळे जनतेत वीज अधिकार्‍यांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. ग्रामीण व शहरी भागात विजेच्या कारभाराचा खेळखंडोबा सुरू असून वीजपुरवठा सतत खंडीत होत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. वीज बिलाच्या वसुलीसाठी वीजपुरवठा तोडण्याचा इशारा देणार्‍या महावितरण मंडळाची सुरळीतपणे वीजपुरवठा करण्याची जबाबदारी नाही का, असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. कधी तांत्रिक बिघाड तर कधी देखभालीच्या नावाखाली दिवसभरात अनेक तास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळेतही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामीण व शहरी भाग अंधारात बुडून जात आहेत.

वीजदेयक वेळेत न भरल्यास उपस्थित होणारे महावितरणाचे प्रशासन वा त्यांचे अधिकारी, प्राधिकारी ग्राहकांच्या संपर्काला प्रतिसाद का देत नाहीत, त्यांना ते कमीपणाचे वाटते का, असा संताप नागरिक व्यक्त करीत आहेत.

Exit mobile version