खुशखबर! जंजिरा किल्लाचे दरवाजे उघणार; पण कधी, जाणून घ्या…

| आगरदांडा | प्रतिनिधी |
पावसाळ्यात सुरक्षेच्यादृष्टिने मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याचे दरवाजे बंद करण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. अशातच जंजिरा किल्ला बंद असल्यामुळे पर्यटकांनी व स्थानिक व्यवसायिकांनी नाराजी दर्शवली होती. अखेर पुरातत्व विभागाने ऐतिहासिक जंजिरा किल्लाचे दरवाजे उघडण्याची घोषणा केली. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक व्यवसायिकांनी प्रशासनाचे आभार मानले.

किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी जेट्टी, खोरा बंदर, दिघी बंदरावरुन पर्यटकांची ने-आण केली जाते. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भागातुन दरवर्षी लाखो पर्यटक ये-जा करतात. पर्यटकांना शिडाच्या बोटीमधुन प्रवास करताना एक वेगळाच आनंद मिळत असुन जास्तीत जास्त पर्यटक शिडाच्या बोटीत बसणे अधिक पसंत करतात. पर्यटकांच्या आगमनामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असून व्यवसायकांची आर्थिक परिस्थिती भक्कम होण्यास मदत होणार आहे.

पावसाळ्यात किल्ल्याच्या सभोवती पाच ते सहा फुट उंचीची झाडे -झुडपे वाढल्याने झुडपात सरपटणारे जनावरे असु शकतात. त्यापासून कोणाला धोका होऊ नये, याकरीता पुरातत्व विभागाने दरवाजे पर्यटकांनसाठी बंद ठेवले होते. आता संपूर्ण किल्लाची साफ सफाई पुर्ण झाली असून उद्या पर्यटकांसाठी किल्ला खुला केला जाईल, अशी माहिती पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली.

Exit mobile version