जर्मनीचे प्रशिक्षक अखेर पायउतार

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जर्मनी फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक जोकिम ल्यू यांची 15 वर्षांपासूनची कारकीर्द अखेर संपुष्टात आली. ल्यू यांनी काही वर्षांपूर्वीच प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यायला हवा होता, असे फुटबॉलमधील जाणकारांचे म्हणणे आहे.

जर्मनीने यंदाच्या युरो चषकात बाद फेरीत प्रवेश केला असला तरी त्यांना मंगळवारी इंग्लंडकडून 2-0 असा पराभव पत्करावा लागला. ल्यू यांनी जर्मनीला 2014च्या विश्‍वचषकाचे जेतेपद मिळवून दिले, तसेच 2016च्या युरो चषकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून दिली. मात्र, गेल्या विश्‍वचषक स्पर्धेत सुरुवातीलाच गारद झालेला जर्मनीचा संघ अद्यापही सावरला नाही.

Exit mobile version