| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील मुळेखंडफाटा येथे राहणारी भक्ती हरेश्वर म्हात्रे (23) ही रविवार (दि. 20) रोजी राहत्या घरातून कोणाला काहीएक न सांगता कोठे तरी निघून गेली आहे.

मुलीचे वडील हरेश्वर कृष्णा म्हात्रे यांनी आपली मुलगी हरविली असल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात केली आहे. या हरविलेल्या मुलीचे लांब काळे केस, नाक सरळ, डोळे मोठे, बांधा मध्यम, चेहरा उभट, उंची 5 फूट 5 इंच, अंगात राखाडी रंगाचा टी शर्ट, काळ्या रंगाची सँडल, गळ्यात सोन्याची चेन, त्यात बदामी आकाराचे पॅडल, हातात कडा व पिंक कलरचे पिंक घड्याळ, हातावर मेहंदी, डाव्या हाताच्या पंज्यावर जुनी भाजलेली जखम, सोबत सॅमसन कंपनीचा मोबाईल फोन त्यात ओडाफोन कंपनीचे सिमकार्ड नं. 7045388941 अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास उरण पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रदेवी पाटील या प्रकरणाबाबत अधिक तपास करीत आहेत.







