मुलीच्या लिव्हरने वाचले पित्याचे प्राण

। जेएनपीटी । वार्ताहर ।
आजकालच्या युगात जमिनीतून हिस्सा मागणार्‍या मुली आपण नेहमीच बघत असतो, पण मरणाच्या दारात असणार्‍या जन्मदात्या पित्याचे प्राण वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणार्‍या मुली खूप कमी बघायला मिळतात,अशीच एक मुलगी चिरनेर गावातील अक्षता प्रशांत खारपाटील हिने आपल्या जन्मदात्या पित्याला मरणाच्या दारातून बाहेर काढण्यासाठी चक्क आपला लिव्हर देऊन जीवनदान देण्याचे काम केले.आणि समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा उरण पंचायत समितीचे माजी उपसभापती कै.काळूशेठ खारपाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव प्रशांत काळूशेठ खारपाटील (वय 45) यांना कोरोनाच्या संकटात लिव्हर सिराँसीन हा आजार जडला. त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज आहे अशी माहिती नवीमुंबई येथील अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांना सहा महिन्यांपूर्वी दिली. यावेळी प्रशांत खारपाटील यांची जेष्ठ कन्या अक्षता हिने आपला लिव्हर देण्याची इच्छा कुटुंबियां समोर तसेच डॉक्टरांजवळ व्यक्त केली. अक्षताने देवू केलेल्या लिव्हर मुळे मुंबई ( परेल ) येथील ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टर रवि मोहंका व त्यांच्या पुर्ण टीमच्या बारा तासांच्या अथक प्रयत्नाने प्रशांत यांच्या वर नूकताच यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली. आज प्रशांत व त्यांची मुलगी अक्षता हे दोन्ही बाप लेक सुखरूप आपल्या घरी परतले आहेत. त्यामुळे अक्षता सारखी कन्या सर्वांना मिळावी अशी प्रार्थना मरणाच्या दारातून बाहेर आलेल्या प्रशांतने महागणपती चरणी व्यक्त केली.

Exit mobile version