जगभरातून कौतुकाचा वर्षाव
| टोक्यो | वृत्तसंस्था |
लांब उडीच्या स्पर्धेत कतारचा मुताज आणि इटलीचा गनमार्को यांच्यात बरोबरी झाल्याने दोघांना पुन्हा संधी देण्यात आली. त्यातही दोघांना 2.37 पेक्षा अधिक लांब उडी मारता आली नाही. त्यामुळे पुन्हा संधी देण्यात आली. परंतु, गनमार्कोने दुखापतीमुळे माघार घेतली.
शेवटची संधी घेऊन मुताज सहज सुवर्णपदक खिशात घालू शकला असता; पण त्याने असं न करता पंचांशी बोलून मीदेखील माघार घेतली तर आम्ही पदक वाटून घेऊ शकतो का? असं विचारलं. ज्यावर पंचानी होकार देत सुवर्णपदक वाटून देण्याची घोषणा केली.
पंचांच्या निर्णयानंतर त्याच क्षणी इटलीचा गनमार्कोने मुताजला धावत येऊन मिठी मारली. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, माणुसकी आणि मैत्रीच्या नात्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून या अंतिम सामन्याची वाह वाह करण्यात येत आहे.