भारताच्या लेकीची सुवर्ण भरारी

| नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. स्वीटी बूरा हिने 81 किलो वजनी गटात चीनच्या वांग लीना हिला हरवून सुवर्णपदक जिंकले. स्वीटीने हा सामना 4-3 अशा फरकाने जिंकला. स्वीटीने पहिल्या फेरीपासूनच चिनी बॉक्सरवर वर्चस्व राखले. तिने पहिल्या फेरीतच चिनी बॉक्सरच्या चेहर्‍यावर जोरदार पंचेस लगावले आणि पहिली फेरी 3-2 अशी जिंकली.

महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये नीतू घंघास नंतर आता स्वीटी बुराने सुवर्णपदक जिंकले आहे. स्वीटी बूरा हिने 81 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. तिने अंतिम सामन्यात चीनच्या वांग लीनाचा पराभव केला. अशाप्रकारे भारताचे हे आजचे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी नीतू घंघासने मंगोलियन बॉक्सरचा पराभव करून भारताला दिवसातील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. आता स्वीटी बुराने चीनच्या खेळाडूला हरवून दुसरे सुवर्णपदक भारताच्या झोळीत टाकले आहे. त्याच वेळी, याआधी नीतू घंघासने 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते.

भारतीय बॉक्सर नीतू घंघासने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. नीतू घंघासने 48 किलो वजनी गटात मंगोलियाच्या लुत्सेखान अल्टेंगसेंगचा पराभव केला. भारतीय बॉक्सरने हा सामना 5-0 असा जिंकला. तत्पूर्वी, शनिवारी नीतू घंघासने उपांत्य फेरीच्या सामन्यात कझाकिस्तानच्या बॉक्सरचा पराभव केला. त्याचवेळी स्वीटी बूराने भारताला दिवसातील दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.







Exit mobile version