| अलिबाग | प्रतिनिधी |
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा ठाव घेऊन त्यांच्या अंतर्मनाचा वेध घेवून, सर्वांगीण विकासाला वाव देण्याकरिता प्रभाविष्कार सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील पीएनपी शैक्षणिक संकुलाद्वारे ‘प्रभाविष्कार’ या सांस्कृतिक सोहळ्याचे 19 ते 22 डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. चार दिवस उत्साह आणि जल्लोषमय वातावरणात पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या वेश्वी येथील भव्य दिव्य संकुलात प्रभाविष्कार सोहळा संपन्न झाला.
22 डिसेंबर रोजी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात आयोजित केलेल्या सोहळ्याकरिता प्रमुख मान्यवर म्हणून इंडियन आयडॉल फायनालिस्ट नचिकेत लेले, पीएनपी कॉलेजचा माजी विद्यार्थी प्रसिद्ध गायक, संगीतकार, वादक प्रेम कोतवाल, शेकाप अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, संजय माळी, नागेश कुलकर्णी, अलिबाग तालुका महिला आघाडी अध्यक्षा नागेश्वरी हेमाडे, अलिबागमधील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. राजेंद्र चांदोरकर, डॉ. राजश्री चांदोरकर उपस्थित होत्या.
याप्रसंगी महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, प्राचार्य रविंद्र पाटील, होली चाईल्ड सीबीएसई स्कूलच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल वेणी, स्टेट बोर्ड मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, बी. एड. कॉलेजच्या प्रा. ऋतिषा पाटील, कार्यालयीन मार्गदर्शक गबाजी गीते, प्रशासन अधिकारी हिरेन राठोड, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक व इतर मान्यवर, शाळांचे मुख्याध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते.गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि प्रमुख पाहुणे गायक नचिकेत लेले, सध्या सोशल मिडियावर ट्रेंड असलेले फेमस सॉग गुलाबी साडी आणि लाली लाल… हे त्यांनी गाणे गायले या गाण्याने संकुल दणाणून सोडले, तरूणाईयाने या गाण्याचा मनमुराद आनंद लुटला. त्याच प्रमाणे संपूर्ण सोहळ्यामध्ये सुरुवातीपासून मराठी हिंदी गाणी, फॅशन शो तसेच विविध गाण्यांवर नृत्याविष्काराचे सादरीकरण केले, कॉलेजचा माजी विद्यार्थी गायक प्रेम कोतवाल यांनी सुद्धा सुंदर असे गाण्यांचे सादरीकरण केले. छावा सिनेमातील गाणे आणि विद्यार्थ्यानी केलेला अभिनय यामुळे सर्व भारावून गेले. कार्यक्रमाचा शेवट डी जे नाईटच्या उत्साहा मध्ये पार पडला.
डॉ. राज प्रॉडक्शन प्रस्तुत व्हिडिओ
अल्बमचा ‘बाप आभाळाचा निवारा' दमदार टिझर प्रभाविष्कार दरम्यान दाखवण्यात आला.यामध्ये गरीब पित्याची आपल्या मुलाची हौस व आवड पुरी करण्याची धडपड दिसत आहे. हे गाणे येत्या शुक्रवारी रिलीज होणार आहे, कलाकार बाप व्यक्तिरेखा डॉ. राजेंद्र चांदोरकर, मुलगा बाल कलाकार सैराज केंद्रे, गाण्याचे दिग्दर्शन सचिन कांबळे यांनी केले तर निर्मिती
डॉ. राजश्री चांदोरकर यांची आहे.












