झुंझार पोयनाडचे मैदान युवा खेळाडूंना न्याय देणारे: अ‍ॅड भूषण साळवी

| पोयनाड | वार्ताहर |
पोयनाड येथील झुंझार युवक मंडळाने आयोजित केलेल्या कै. अ‍ॅड. शिरीष पाटील स्मृतिचषक ज्युनिअर गटाच्या एकदिवसीय 40 षटकांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन रविवारी रायगड जिल्ह्याचे सरकारी वकील व शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. भूषण साळवी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी अ‍ॅड. भूषण साळवी यांनी बोलताना झुंझार युवक मंडळाचे सुसज्ज मैदान हे जिल्ह्यातील युवा खेळाडूंना न्याय देणारे ठरणारे असल्याचे सांगितले.

अ‍ॅड. शिरीष पाटील स्मृतिचषक ही एकदिवसीय 40 षटकांची लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा जिल्ह्यातील युवा खेळाडूंसाठी पर्वणीच असणार आहे. टी-20 फॉरमॅट सर्वत्र सुरू असताना एकदिवसीय सामने आयोजित केल्याने खेळाडूंचे कौशल्य, प्रतिभा व धैर्य पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील नामवंत क्लब, अकॅडमी, असोसिएशने स्पर्धेत सहभाग घेतला आहे. प्रथम लीग व नंतर बाद फेरीनुसार स्पर्धा खेळली जाणार असून, स्पर्धा एक महिना चालणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी अ‍ॅड. भूषण साळवी, जिल्हा क्रिकेट असो.चे कार्याध्यक्ष जयंत नाईक, आरपीएलचे अध्यक्ष राजेश पाटील, माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, अ‍ॅड. महेश म्हात्रे, अ‍ॅड. जाई पाटील, पोयनाडचे मा. सरपंच भूषण चवरकर, सदस्य किशोर जैन, रायगड पोलीसचे सचिन खैनार, सुहास हिरवे, झुंझारचे अध्यक्ष अन्वर बुराण, सचिव किशोर तावडे, अजय टेमकर, सुजित साळवी, संतोष चवरकर, योगेश चवरकर, राजेंद्र जाधव, अ‍ॅड. पंकज पंडित, पंकज चवरकर, संदीप जोशी, संकेश ढोळे, आदेश नाईक यांच्यासह पोयनाड विभागातील क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

Exit mobile version