• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कृषीवलच्या हळदीकुंकवातून महिलांच्या समतेचा सन्मान

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 16, 2026
in sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, रायगड
0 0
0
कृषीवलच्या हळदीकुंकवातून महिलांच्या समतेचा सन्मान
0
SHARES
68
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अलिबागमधील सोहळ्यात हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

चूल आणि मूल या चौकटीत अडकलेल्या महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम थोर समाजसुधारकांनी केले. हाच विचार पुढे नेत कृषीवलने आयोजित केलेला भव्य हळदीकुंकू समारंभ महिलांसाठी केवळ सौभाग्याचा नव्हे, तर समता, सन्मान आणि व्यक्त होण्याच्या हक्काचा उत्सव ठरला. चार भिंतींच्या आत दडपल्या गेलेल्या भावना, विचार आणि आनंद या समारंभाच्या निमित्ताने मोकळेपणाने व्यक्त झाला. धकाधकीच्या दैनंदिन जीवनातून थोडा निवांत श्वास घेण्यासाठी, घरकामात गुंतलेल्या महिलांना स्वतःसाठी वेळ मिळावा, विचारांची देवाण-घेवाण व्हावी, संवाद घडावा या उद्देशाने कृषीवलने ही परंपरा सातत्याने जपली आहे. हळदीकुंकू म्हणजे केवळ वाण देण्याचा कार्यक्रम नसून, महिलांमधील समानतेचा आणि सन्मानाचा संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. त्याला अलिबाग व परिसरातील हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

शुक्रवारी (दि. 16) दुपारी तीन वाजल्यापासून महिलांची गर्दी वाढू लागली आणि सायंकाळपर्यंत पीएनपी नाट्यगृहाचा परिसर महिलांच्या उपस्थितीने फुलून गेला. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी हळदीकुंकू लावत एकमेकांचे औक्षण केले. सौभाग्याचे आणि मानाचे वाण देण्यात आले. संपूर्ण वातावरण उत्साह, आनंद आणि महिलांच्या एकजुटीचे दर्शन घडवणारे होते.

या समारंभाला सन मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमधील कलाकारांनी हजेरी लावली. प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने कलाकारांनीही समाधान व्यक्त केले. लेझीम पथकाच्या पारंपरिक नृत्याने सेलिब्रिटींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. खेळ, लकी ड्रॉ, विविध खरेदी स्टॉल्स आणि मनोरंजनामुळे हा समारंभ महिलांसाठी एक पर्वणी ठरला.

कृषीवलचा स्तुत्य उपक्रम ः वैभवी चव्हाण
कृषीवल आयोजित हळदीकुंकू समारंभाला येण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांना भेटता आले. त्यांची संवाद साधता, आला. एक चांगला उपक्रम कृषीवलने राबविला आहे, असे सांगत वैभवी चव्हाण यांनी सन मराठी वाहिनीतील ‌‘हुकुमाची राणी ही' या मालिकेतील त्यांची राणी म्हणून असलेल्या भूमिकेबाबत माहिती दिली. या मालिकेतील राणी ही जिद्दी आणि कष्टाळू आहे. दुसऱ्यांचे हित जपणारी आणि प्रेम करणारे एक व्यक्तीरेखा आहे. अन्यायाविरोधात लढणारी आहे. या मालिकेने संयम ठेवायला शिकवले आहे, ते त्या म्हणाल्या.
कृषीवलमुळे प्रेक्षकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली ः अक्षय पाटील
कृषीवलच्या हळदीकुंकू समारंभाच्या निमित्ताने अलिबागमध्ये येण्याची संधी मिळाली. योग्य असे व्यवस्थापन पाहावयास मिळाले. चित्रलेखा पाटील यांंच्या माध्यमातून राबविलेल्या या उपक्रमाचे खऱ्या अर्थाने कौतुक आहे. मालिकांमध्ये काम करीत असताना भूमिकेबाबत प्रत्यक्षपणे प्रेक्षकांचे काय मत असते, हे कळत नाही. परंतु, आज कृषीवल हळदीकुंकू समारंभानिमित्ताने मालिकेविषयी असलेले प्रेम दिसून आले. या मालिकेत इंद्रा हा शिस्तप्रिय व हळव्या मनाचा आहे. टॅलेंट असले तरी कष्ट असणे गरजेचे आहे. या विचाराचा तो आहे. प्रत्यक्ष जीवनातही हाच विचार घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे अक्षय पाटील म्हणाले.
महिलांची उपस्थिती बघून भारावून गेले ः योगिता चव्हाण
कृषीवल हळदीकुंकू समारंभाच्या निमित्ताने अलिबागमध्ये येण्याची संधी मिळाली. अलिबाग एक पर्यटनाच्या दृष्टीने कायमच चांगले आहे. कृषीवल हळदीकुंकू समारंभात हजारो महिलांची उपस्थिती पाहून खऱ्या अर्थाने भारावून गेलो आहे. ‌‘तू अनोळखी तरी सोबती' या मालिकेवर आणि आमच्या भूमिकेवर प्रेम करणारे प्रेक्षक म्हणून आनंद वाटला. या मालिकेबाबत सांगायचे झाल्यास सुंदर अशा प्रेमाची स्टोरी या मालिकेत आहे. दोघांचाही स्वभाव समान आहे. अर्पिता चाळीमध्ये एक लाडकी आहे. या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे योगिता चव्हाण उर्फ या अर्पिता म्हणाल्या.
कृषीवलमुळे कार्यक्रमाची संधी मिळाली ः अंबर गणपुले
‌‘तू अनोळखी तरी सोबती' या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत समीर नावाची व्यक्तीरेखा साकारली आहे. या मालिकेला भरभरून प्रेम मिळत आहे, असे बोलत असताना अंबर गणपुले उर्फ समीर म्हणाले की, कृषीवलच्या हळदीकुंकू समारंभात आज आल्याचा आनंद वाटलो. महिलांची ही गर्दी बघून खूपच समाधान वाटले. आमच्यासोबत फोटो काढण्याबरोबरच सेल्फी काढण्याचा आनंद अनेकांनी घेतला हे बघून खूपच बरे वाटले, असे अंबर गणपुले उर्फ समीर म्हणाले.
जिद्द आणि चिकाटी असल्यास ध्येय गाठू शकतो ः मोनिका राठी
कृषीवल हळदीकुंकू समारंभात सेलिब्रिटी म्हणून आल्याचे खूप छान वाटले. आयोजकांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केले आहे. मालिकांमध्ये काम करीत असताना प्रेक्षकांचे कलाकारांवर असलेले अप्रत्यक्ष प्रेम कळत नाही. परंतु, कृषीवल हळदीकुंकू समारंभाच्या माध्यमातून आज प्रत्यक्ष प्रेक्षकांचे प्रेम पाहावयास मिळाले. त्यामुळेच काम करण्याची ऊर्जा मिळते. हीच ऊर्जा घेऊन अधिक चांगले काम करणार असे ‌‘इन्स्पेक्टर मंजू' या मालिकेतील मंजू उर्फ मोनिका राठी म्हणाल्या. पुढे त्यांनी सांगितले की, आयुष्याच्या वाटेवर अनेक परीक्षा होतात. मार्ग कधीही सोपा नाही. जिद्द आणि चिकाटी असल्यास ध्येयापर्यंत पोहोचता येते. तेच ध्येय ठेवा, यश नक्की मिळेल, असे आवाहन मोनिका राठी यांनी केले.
मालिकांवर प्रेम करणाऱ्यांना अनुभवता आले ः वैभव कदम
‌‘इन्स्पेक्टर मंजू' मालिकेतील सत्या हा समाजसेवा करणारा, विश्वास ठेवणारा आणि मेहनत घेणारा व्यक्ती आहे. आज कृषीवल हळदीकुंकू समारंभात सेलिब्रेटी म्हणून आल्यावर खूप आनंद झाला. मालिकांवर, आम्हा कलाकांवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केेले आहे, असे वैभव कदम उर्फ सत्या म्हणाले.
देखणे नियोजन ः अशोक फडदेसाई
कृषीवल हळदीकुंकू समारंभात गेल्या तीन वर्षांपासून येण्याची संधी मिळाली आहे. अतिशय देखणे असे नियोजन या कार्यक्रमात असते. यावर्षीदेखील मला या कार्यक्रमात सेलिब्रेटी म्हणून येता आले असे सांगत ‌‘तुझ्यासाठी तुझ्या संग' या मालिकेतील तेजा उर्फ अशोक फडदेसाई म्हणाले की, या मालिकेतील तेजा प्रेमळ व उत्साही, जीव ओतून प्रेम करणारा आहे, असे त्यांनी सांगितले.
खूप आनंद वाटला ः अनुष्का गीते
‌‘तुझ्यासाठी तुझ्या संग' या मालिकेतील वैदेही म्हणाल्या की, ही मालिका गेल्या सहा महिन्यांपासून सुरु आहे. प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. हळदी कुंकू समारंभामध्ये आल्यावर खूप आनंद वाटला, असे अनुष्का गीते उर्फ वैदेही म्हणाल्या.
हजारो महिलांची उपस्थिती
कृषीवल हळदीकुंकू समारंभाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अखेर ही उत्कंठा शुक्रवारी सायंकाळी चारनंतर संपली. दुपारी तीन वाजल्यापासून महिला येण्यास सुरुवात झाली. बोलता बोलता महिलांची अलोट गर्दी झाली. पारंपारिक पेहराव करीत महिला या हळदीकुंकू समारंभामध्ये सहभागी झाल्या. एकमेकांना हळदीकुंकू लावून औक्षण करण्यात आले. त्यानंतर सौभाग्याचे व मानाचे वाण देण्यात आले. एक वेगळा उत्साह निमित्ताने पहावयास मिळाली.
कृषीवलच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका सुप्रिया पाटील,अलिबागच्या माजी नगराध्यक्षा सुनिता नाईक, नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील, साधना पाटील, ॲड. निता पाटील, ॲड. निलम हजारे, शैला भगत, नागेश्वरी हेमाडे, अंजली मोरे, अनिता पवार, संगीता म्हात्रे, वैष्णवी शेट्ये, सुकन्या साखरकर, पीएनपी एज्युकेशन सोसायटी, कृषीवलमधील महिला कर्मचारी तसेच अलिबाग व परिसरातील हजारो महिला उपस्थित होते. महिलांच्या हक्काचे व सौभाग्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या हळदीकुंकू समारंभ महिलांसाठी एक पर्वणीच ठरली आहे.
सेलिब्रेटींचे जल्लोषात स्वागत
अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाच्या परिसरात कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. सन मराठी वाहिनीतील हुकुमाची राणी ही, या मालिकेतील वैभवी चव्हाण (राणी) अक्षय पाटील (इंद्र), इन्स्पेक्टर मंजू मालिकेतील मोनिका राठी (मंजू), वैभव कदम (सत्या), तू अनोळखी तरी सोबती या मालिकेतील योगिता चव्हाण (अर्पिता), अंबर गणपुले (समीर) हे कलाकार उपस्थित होते. ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील महिलांसह शहरी भागातील हजारो महिला या समारंभात सहभागी झाल्या होत्या. सन मराठी वाहिनीवरील वेगवेगळ्या मालिकांमधील सिने तारकांशी गप्पागोष्टी करीत असताना त्यांच्यासोबत सेल्फीचा आनंद लुटला. मान्यवरांसह सेलिब्रिटींचे टाळ्याचा कडकडाट जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, पीएनपी नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारासमोर सेलिब्रेटींचे आगमन होताच, पीएनपी होली चाईल्डमधील लेझीम पथकाने पारंपरिक पद्धतीने लेझीम वाद्यातून नृत्याचे सादरीकरण करीत त्यांचे स्वागत केले.
खेळातून लुटला आनंद
कृषीवल हळदीकुंकू समारंभानिमित्त सौभाग्याचे वाण देण्याचा कार्यक्रम साजरा होत असताना खास महिलांसाठी वेगवेगळया प्रकारचे खेळ आयोजित केले होते. एक ते नऊ आकडे इंग्रजी व मराठीत बोलणे, उखाणे तसेच सध्या सोशल मीडियावरील रिल्समधील गाणी आदी खेळ घेण्यात आले. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने महिला, तरुणींनी सहभाग घेतला. त्यामध्ये पेझारी येथील मिलीना पाटील, बेलकडे येथील उर्मिला नाईक यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून खेळातून महिलांनी आनंद लुटला.
वेगवेगळ्या स्टॉलमध्ये खरेदीची लूट
कृषीवल हळदीकुंकू समारंभानिमित्त खास वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात आले. त्यामध्ये ज्यांना चारचाकी गाडी घेण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी वासन टोयेटो या कंपनीच्या कारचे स्टॉल होते. ज्यांना दुचाकी घेण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी सुझूकी कंपनीची दुचाकी तसेच वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणाऱ्यांसाठी सुहाना मसाले आणि राम बंधू मसाले यांचे स्टॉल होते. तसेच खोजाती फार्मचे स्टॉल होते. या स्टॉलमध्ये खरेदी करण्यासह दुचाकी व कारची बुकींग करण्यासाठीदेखील महिलांची गर्दी दिसून आली. दरम्यान, कृषीवलच्यावतीने लकी ड्रॉदेखील ठेवण्यात आले. यावेळी वीस रुपयांच्या कुपनवर बक्षीस ठेवण्यात आले होते. त्यासाठीदेखील महिलांनी गर्दी केली होती.

Related

Tags: alibag newschitralekha patilHaldikunku Ceremonyindiakrushival haldikunku ceremanykrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadskp newssocial media newssocial newssupriya patil
Previous Post

मिसिंग लिंकची प्रतीक्षा

Next Post

पनवेल पालिकेत महाविकास आघाडीचा जोरदार विजय

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
Next Post

पनवेल पालिकेत महाविकास आघाडीचा जोरदार विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?