उन्हाच्या तडाख्याने खिशाला झळ

एसी, पंखे, कुलर, फ्रिजला मागणी

| नवी मुंबई | प्रतिनिधी ।

गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदल स्थिरावले असून कडकडीत उन्हाळा सुरू झाला आहे. आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने नवी मुंबईकरांना उकाडा जाणवू लागला आहे. सध्या पारा 38 ते 40 अंशांपर्यंत पोहोचला असल्याने ग्रहकांचा ओढा एसी, कुलर, फ्रिज घेण्याकडे कल वाढला आहे.

उन्हाळ्यापासून थंडावा मिळावा या हेतूने ग्राहक खरेदीसाठी दुकानात गर्दी करताना दिसत आहेत. यामुळे एसी, पंखे, कुलर, फ्रिज या वस्तूंची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. वाढलेली मागणी लक्षात घेता दुकानदारांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरातींशिवाय इतर युक्त्या वापरून या साधनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न चालवला आहे. सध्या बाजारात पंख्यांना असलेली मागणी कमी झाली असून; ग्राहकांचा ओढा एसी आणि कुलर घेण्याकडेच जास्त आहे. अशातच एसीची खरेदी आवाक्याबाहेर असणार्‍या सामान्य नागरिकांची कुलरला पसंती दर्शवली आहे; तर गेल्या काही दिवसांत फ्रिजची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाल्याने दुकानांमध्ये ग्राहकांची रीघ लागली आहे.

टॉवर फॅनच्या मागणीत वाढ
बाजारात नव्याने उपलब्ध होत असलेल्या टॉवर फॅनचीदेखील मागणी वाढली आहे. पूर्वी असणार्‍या टेबल फॅनपेक्षा आकर्षित असे टॉवर बाजारात उपलब्ध होत आहे. विविध कंपन्यांचे 1500 रुपयांपासून 4000 रुपयांपर्यंत फॅन मिळत आहे. या फॅनमुळे टेबल फॅनच्या मागणीत घट होऊ लागले आहे.

उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे एसी व कुलरची मागणी वाढली आहे. रोज दुकांनामध्ये एसी व कुलर घेण्यासाठी ग्राहकांची रीघ लागत आहे. काही जण हे लग्नसराई सुरू असल्यामुळे एसी किंवा कुलर गिफ्ट द्यायचे असल्याने मागणी वाढत आहे.

विक्रेते
Exit mobile version