बीजिंग | वृत्तसंस्था |
चीनच्या मध्य हेनान प्रांतात तब्बल एक हजार वर्षातील सगळ्यात मोठी अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूर परिस्थती व विविध घटनांमध्ये जवळपास 16 लोकांचा जीव गेला आहे. तर, जवळपास एक लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. , चीनमधील भयावह पूर परिस्थितीचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर होत आहेत. अशाच एका व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, एक मेट्रो ट्रेन पूराच्या पाण्याने भरली आहे आणि प्रवाशांच्या गळ्यापर्यंत पाणी पोहचले आहे. हा व्हिडिओ हेनानमधील झेंग्झोऊडोंग स्टेशनचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडितो हे देखील दिसत आहे की, लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. एक मेट्रो स्टेशन संपूर्ण पाण्याखाली गेले असून, तेथील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचीही माहिती समोर आली आहे.