काय बोलताय काय…भारतीयांची उंची घटलीय

संशोधनातून समोर आलं वास्तव
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
गेल्या काही वर्षांपासून जगभरातील नागरिकांची उंची वाढत आहे. मात्र, भारतीयांच्या उंचीमध्ये घट होत असल्याने खळबळ निर्माण झाली आहे. 2005 ते 2015ते16 मध्ये देशातील महिला व पुरुषांची सरासरी उंची घटली आहे. यामध्ये आदिवासी समाजासोबतच गरीब कुटुंबातील महिलांची उंची मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मात्र, असं का घडतंय? हे देखील महत्वाचे आहे.
राष्ट्रीय कौटुंबीक आरोग्य सर्व्हेच्या आकेडवारीच्या आधारावर हा अभ्यास केला आहे. यामध्ये 15 ते 25 आणि 26 ते 50 वयोगटातील महिला आणि पुरुषांचा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये भारतातील नागरिकांचा सर्व्हे वाईट असल्याचे दिसून आला. उंची पोषण तसेच सार्वजनिक आरोग्याच्या सर्वात मूलभूत निर्देशकांपैकी एक आहे आणि ती थेट देशाच्या एकूण जीवनमानाशी जोडलेली आहे. हे जात आणि उत्पन्न यांसारख्या सामाजिक आणि आर्थिक घटकांना देखील प्रभावित करते.जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील सामाजिक चिकित्सा आणि सामुदायिक आरोग्य केंद्रातील कृष्णा कुमार चौधरी, सायन दास आणि प्रचिनकुमार घोडाजकर यांनी नॅशनल फॅमिली हेल्थ सर्विसच्या तिन्ही सर्व्हेचा अभ्यास केला.

उंची घटणे चिंताजनक
सरासरी उंची कमी होणे म्हणजे भारत सार्वजनिक आरोग्य तसेच आर्थिक उद्दिष्टांवर मागे पडत असल्याचे दिसून येते. जगभरात सरासरी उंचीच्या एकूण वाढीच्या संदर्भात भारतातील प्रौढांची सरासरी उंची कमी होणे चिंताजनक आहे. यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचेही संशोधनामध्ये म्हटले आहे
संशोधकांना असे आढळून आले की 2005-’06 ते 2015-’16) दरम्यान, 15-50 वयोगटातील भारतीयांच्या (26 ते 50 वयोगटातील महिला वगळून) उंचीमध्ये घट दिसली. 15-25 दरम्यान स्त्रियांच्या 0.12 सेमीने घट झाली, 26-50 वयोगटातील महिलांमध्ये 0.13 ने वाढ झाल्याचे दिसून आले. याच कालावधीत, 15-25 च्या दरम्यानच्या पुरुषांनी त्यांच्या सरासरी उंचीमध्ये 1.10 सेंटीमीटरची घट दिसून आली, तर 26-50 वर्ष वयोगटातील नागरिकांमध्ये 0.86 सेमी घट झाली.

Exit mobile version