शिंदे गटाला धक्का! हायकोर्टाने सदा सरवणकरांची याचिका फेटाळली

। मुंबई । वृत्तसंस्था ।
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला परवानगी देण्याबाबतची शिंदे गटाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे शिंदे गटाला धक्का बसला आहे. त्यामुळे शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. परंतु न्यायालय आणखी शिवसेनेच्या याचिकेवर निर्णय देणं अद्याप बाकी आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्या परवानगी मिळणार का याचा निर्णय अपेक्षित आहे.

वर दसरा मेळावा कोण घेणार? यावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान शिवसेना, मुंबई महापालिका आणि शिंदे गटाकडून आपापली बाजू मांडण्यात आली आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. दसरा मेळाव्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर बोट ठेवत मुंबई महापालिकेने शिवसेना आणि शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनीही मध्यस्थ याचिका दाखल करण्यात आली होती.

शिवाजी पार्कच्या संदर्भातील याचिकेवर याचिकाकर्ते शिवसेनेसाठी कायदेतज्ञ आस्पी चिनॉय बाजू मांडली. तर प्रतिवादी मुंबई महापालिकेसाठी कायदेतज्ञ मिलिंद साठ्ये बाजू मांडली. तर मध्यस्थ म्हणून आलेल्या सदा सरवणकरांसाठी कायदेतज्ञ जनक द्वाकरादास यांनी बाजू मांडली. तिन्ही बाजूंकडनं न्यायालयात वकिलांची तगडी फौज तैनात करण्यात आली होती.

Exit mobile version