जिल्ह्यात सुधागड तालुक्यात सर्वाधिक पाऊस

| पाली/बेणसे । वार्ताहर ।
जिल्ह्यात सोमवारी (ता.11) ते मंगळवारी (ता.12) 24 तासात सरासरी 94.20 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 192.00 मि.मी पाऊस सुधागड तालुक्यात पडला. जिल्ह्यात 1 जून पासून मंगळवारी (ता.12) पर्यंत एकूण सरासरी 1 हजार 275.49 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात मागील वर्षी 12 जुलै रोजी सरासरी 18.26 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली होती. तसेच 1 जून पासून 11 जुलै 2021 अखेर पर्यंत एकूण सरासरी 1 हजार 097.76 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातून मंगळवारी (ता.12) प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार, तालुकानिहाय पावसाची नोंद अलिबाग 51.00 मि.मी., पेण 120.00 मि.मी., मुरुड 46.00 मि.मी., पनवेल 88.80 मि.मी., उरण 06.00 मि.मी., कर्जत 150.40 मि.मी., खालापूर 130.00 मि.मी., माणगाव 76.00 मि.मी., रोहा 149.00 मि.मी., सुधागड 192.00 मि.मी., तळा 91.00 मि.मी., महाड 110.00 मि.मी., पोलादपूर 94.00 मि.मी, म्हसळा 43.00 मि.मी., श्रीवर्धन- 14.00 मि.मी., माथेरान- 146.00 मि.मी. मंगळवारी (ता.12) जिल्ह्याचे एकूण पर्जन्यमान 1 हजार 507.20 मि.मी. इतके होते. त्याची सरासरी 94.20 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 41.13 टक्के इतकी आहे.

Exit mobile version