माझ्यापेक्षा शिक्षकाना सर्वाधिक पगार -राष्ट्रपती


I कानपूर I वृत्तसंस्था I
राष्ट्रपतींपेक्षा शिक्षकांना पगार सर्वाधिक असतो,असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे.कानपूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आपल्याकडे राष्ट्रपतींना सर्वात जास्त पगार आहे, पण ते टॅक्सदेखील देतात, असं रामनाथ कोविंद यांनी सांगितलं. मला पाच लाख रुपये पगार मिळतो याची सगळे चर्चा करतात. पण प्रत्येक महिन्याला त्यातील पावणे तीन लाख रुपये कराच्या स्वरुपात निघून जातात. मग राहिले किती? जेवढे राहिले त्यापेक्षा जास्त तर आमचे अधिकारी वैगेरेंना मिळतात. हे जे शिक्षक बसले आहेत त्यांना तर सर्वात जास्त मिळतात,असे ते म्हणाले.

Exit mobile version