। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहरात वांजळे रस्त्यात प्रवासादरम्यान हरवलेल लाखो रुपयाचे सोन्याचे ब्रेसलेट प्रामाणिकपणे परत देण्याची घटना शुक्रवारी (दि.13) घडली आहे.
बोर्लीपंचतन येथील नितेश मुद्राळे यांचे वांजळे या रस्त्यावर त्यांच्या हातातील 1 लाख 25 हजार किंमतीचे सोन्याच ब्रेसलेट हातातून निसटून पडले होते. त्यानंतर याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रेसलेट मालक मुद्राळे यांच्याकडून वस्तू हरवलेली असून कोणाला मिळाली असल्यास परत करावी, असे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, उमेर जंजिरकर याला ब्रेसलेट मिळाल्यानंतर सोने दुकानदार किरण तळकर यांच्याशी संपर्क करून ही वस्तू ज्याची असेल त्याला मिळावी यासाठी विनंती केली. यावेळी सोशल मीडियावरील पोस्ट पाहून मुद्राळे यांना संपर्क साधून ब्रेसलेट त्यांना सुपूर्द करण्यात आले.






