स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना ध्वजारोहणाचा मान

| नेरळ | वार्ताहर |

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नेरळ स्टेशन येथे ध्वजारोहण करण्याचा मान स्वातंत्र्यसैनिक भगत मास्तर यांचे वारसदार लता अविनाश भगत यांना मिळाला. स्टेशन प्रबंधक गुरुनाथ यशवंत पाटील यांनी यावर्षी पहिल्यांदा योग्य निर्णय घेऊन हुतात्म्यांचा बहुमान केल्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या सहकार्यातून हुतात्म्यांच्या कार्याविषयी माहिती फलक व परिसरातील सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा फोटो लावून सर्व देशातून येणार्‍या प्रवाशांना त्यांच्या कार्याविषयी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न स्टेशन मॅनेजर पाटील यांच्याद्वारे करण्यात आला.

स्टेशन प्रबंधक गुरुनाथ पाटील यांनी व संतोष जामघरे यांनी आपल्या मनोगतात स्थानिक स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी महाप्रबंधक मध्य रेल्वे यांचा संदेशाचे वाचनसुद्धा करण्यात आले.

याप्रसंगी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे सचिव संतोष जामघरे, आरपीएफ इन्स्पेक्टर कुलदीप यांनी सर्व कार्यरत आरपीएफ स्टाफसोबत सहभाग घेतला. होमगार्ड, स्टेशन तिकीट चेकिंग कर्मचारी, मुख्य वाणिज्य पर्यवेक्षक के.जी. विनोद, सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version