सिडको प्रकल्पग्रस्तांची घरे कायम होणार

महाविकास आघाडीचा निर्णय

। उरण । वार्ताहर ।
नवी मुंबई, उरण पनवेल मधील सिडको प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केल्याने लोकनेते दि. बा पाटील यांचे स्वप्न साकार झाले आहे. सिडको प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्यासाठी गेली अनेक वर्षे सिडको व राज्य सरकार सोबत संघर्ष चालू होता. सिडको मधील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या घरांना सिडको अधिकृत मान्यता देत नव्हती. परंतु 2019 साली राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकनेते. दि. बा. पाटील साहेब सर्वपक्षीय कृती समिती पदाधिकार्‍यांसमवेत चर्चा करुन हा प्रश्‍न तातडीने निकाली काढला जाईल असे जाहीर केले. यासाठी गेले एक -दीड वर्ष या विषयावर बैठका, चर्चा चालु होत्या. अनेक संघर्षानंतर काल राज्याचे नगरविकास मंत्री नामदार श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाचे प्रकल्पग्रस्तांकडून स्वागत केले जात आहे.

Exit mobile version