। मुंबई । प्रतिनिधी ।
गिरगावच्या खाडिलकर मार्गावर सोमवारी (दि.05) सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. भररस्त्यात पत्नीवर ब्लेडचे वार करून पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला.
घटनेतील महिला शीतल चव्हाण (30) हिचे सागर बेलोसे (32) यांच्यासोबत विवाह झाला असून त्यांना दहा वर्षांचा मुलगा आहे. काही दिवसांपासून या दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाले होते. त्यामुळे शीतल आपल्या माहेरी राहत होती. तर सागर तिला घरी येण्यास बजावत होता. हा राग डोक्यात धरून सागरने शीतलचा विरार येथून पाठलाग करून सकाळी त्याने खाडिलकर मार्गावर शीतलला अडवले आणि भररस्त्यात त्याने तिच्या मानेवर ब्लेडने सपासप वार केले. त्यानंतर त्याने तेच ब्लेड स्वतःच्या मनगटावरून फिरवले. यात ते दोघेही जखमी झाले.
भररस्त्यात ही घटना घडल्याने रस्त्यावर गर्दी झाली. त्यातील काहींनी दोघांना रुग्णालयात नेले. तर काहींनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.