मूर्ती लहान, पण कीर्ती महान!

लहानग्या अर्शियाने उचलले 75 किलो वजन

। मुंबई । वृत्तसंस्था ।

भारताची 9 वर्षांची अर्शिया गोस्वामी हिने 75 किलो वजन उचलत अनेकांचे लक्ष वेधले आहे. तिचा वेटलिफ्टिंगचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. नुकताच तिचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. यामध्ये ती तब्बल 75 किलो डेडलिफ्ट करताना दिसत आहे. या व्हिडिओला 22 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. 48 मिलियनहून अधिक व्ह्युज आले आहेत. तिच्या या अकाऊंटवर तिचे याव्यतिरिक्तही अनेक वेटलिफ्टिंगचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.

अर्शिया ही हरियाणातील पंचकुला येथील असून ती गेल्या काही वर्षांपासून वेटलिफ्टिंग करत आहे. तिने गेल्या काही वर्षात वेटलिफ्टिंगमध्ये दाखवलेल्या तिच्या ताकदीने आणि समर्पणाने तिचे कौतुक होत आहे. तिने 2021 साली जेव्हा वयाच्या 6 व्या वर्षीय 45 किलो वजन उतलले होते, त्यावेळी ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यावेळी ती सर्वात युवा डेडलिफ्टर ठरली होती. तिने 2023 मध्ये 60 किलो वजन उचलत पुढचे पाऊल टाकले होते. आता तिने अगदी सहजतेने 75 किलो वजन उचलले आहे. तिने तिच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये असेही सांगितले होते की भारताची ऑलिम्पिक पदकविजेती मिराबाई चानू ही तिची आदर्श असून तिचीही ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे.

Exit mobile version