उद्यानाचे लोकार्पण संपन्न

| पनवेल | वार्ताहर |

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या वतीने येथील उरण रोडच्या बाजूला घनदाट जंगल प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर रोटरी क्लबच्या वतीने उद्यान विकसित करण्यात आले आहे. घनदाट जंगल प्रकल्पाच्या प्रथम वर्धापन दिनाच्या औचित्याने विकसित केलेल्या उद्यानाचे लोकार्पण सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर नागरिकांसाठी उद्यान विकसित करण्यात आले. लहान मुलांसाठी खेळणी, जॉगिंग ट्रॅक, शोभिवंत फुलझाडे, उत्तम प्रकाश योजनामुळे हे उद्यान पनवेलकरांच्या हक्काचे विरंगुळ्याचे ठिकाण बनणार आहे. घनदाट जंगल प्रकल्प प्रथम वर्धापन दिन सोहळ्यासाठी आणि उद्यान लोकार्पण कार्यक्रमासाठी माजी नराध्याक्ष जे. एम. म्हात्रे, महेंद्र घरत, बबन पाटील, रामदास शेवाळे, मा. विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, दर्शना भोईर, प्रशांत देशमुख, लक्ष्मण पाटील, रतन खरोल, कविता चौतमोल, चारुशीला घरत, अरुणकुमार भगत, राजू सोनी, संदीप गायकवाड, अनिल ठकेकर, सुनील गाडगे, ऋषिकेश बुवा, दीपक गडगे, संतोष घोडीदे, अनिल खांडेकर, गिरीश वारंगे, शैलेश पोटे, विवेक वेलणकर, विक्रम कैया, भगवान पाटील, मनोज आंग्रे, प्रीतम कैया यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version