। खारेपाट । वार्ताहर ।
दुबई येथे ईरानियन स्पोर्ट क्लब दुबई आयोजित डायरेक्ट व्हालिबॉल दुबई ओपन वर्ल्ड चॅम्पियनशिप कप, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचा पहिल्यांदाच दणदणीत विजय संपादन करून संपूर्ण जगात भारतीय खेळाडूंना क्रिडा क्षेत्रात कौशल्य दाखवून भारत देशाचा तिरंगा फडकवला आहे. महत्वाचे म्हणजे भारतीय संघाचे कोच शरद कदम यांनी भारतीय संघातील सर्व खेळाडूंचे तसेच आयोजक दुबई प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. बाद फेरीत सेमी फायनल कॅनडा विरुद्ध भारत यांच्यात झाली. तर अंतिम लढत टांझानिया संघास दोन गेममध्येच पराभूत केले. पहिला गेम भारत गुण 15 व टांझानिया गुण 6 दुसरा गेम भारत गुण 15 व टांजानिया 11 असा अटीतटीचा सामना रंगला.
आंतरराष्ट्रीय विजेता ठरलेल्या भारतीय संघातून व्हीपीन चेहल कर्णधार हरियाणा, अंकुश पाठक उपकर्णधार महाराष्ट्र, तर खेळाडू फुलचंद्र वाघ महाराष्ट्र, सोयेब बेगमपुरे महाराष्ट्र, चिंतन मेहता गजरात, अंकूर गुजरात, ओमकार चक्रणारायण गुजरात, बासू धायतोडे महाराष्ट्र, धिरज दळवी महाराष्ट्र, बिरजू मल्लीक हरियाणा यांनी उत्तम कामगिरी केली. तसेच भारतीय संघाचे प्रशिक्षक कोच शरद कदम महाराष्ट्र त्याचप्रमाणे टिम व्यवस्थापक हेमा छटवाणी, उप व्यवस्थापक शुभांगी सिकरवर यांनी संघाचे उत्तम नेतृत्व केले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण दुबई येथील क्लबचे मुन्ना भाई, मेहबुब भाई यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेत विविध राष्ट्रांतील अनेक संघांनी प्रवेश घेतला होता.