| अॅडलेड । वृत्तसंस्था ।
ऑस्ट्रेलियात सुरु असणार्या टी-20 विश्वचषक 2022 मधील इंग्लंड विरुद्ध भारत सेमीफायनल सामन्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली जखमी झाला आहे. नेटचा सराव करताना हर्षल पटेलचा चेंडू विराट कोहलीच्या मांडीवर आदळला. कोहलीला खूप दुखापत झाली असून तो नेट प्रॅक्टिस अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला आहे. कोहली या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. टीम इंडियाने गटात अव्वल स्थान पटकावत उपांत्य फेरीत धडक मारली हा विराट कोहलीच्या कामगिरीचा चमत्कार आहे. विराट कोहली हा त्या उंचीचा खेळाडू आहे ज्याची जागा दुसरा कोणी घेऊ शकत नाही.
याआधी मंगळवारी कर्णधार रोहित शर्मालाही नेट सराव करताना दुखापत झाली होती. मात्र, काही वेळाने रोहित शर्मा मैदानात परतला. रोहित शर्माने बुधवारी त्याचे फिटनेस अपडेट जारी केले. सेमीफायनल सामना खेळण्यासाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे रोहित शर्माने सांगितले आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक 2022च्या उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना 10 नोव्हेंबरला ऍडलेडच्या ओव्हलमध्ये खेळला जाणार आहे.
या महत्वपूर्ण सामन्याची पूर्वतयारी म्हणून भारतीय संघ मैदानावर सराव करण्यास पोहोचला, तेव्हाच भारताचा स्टार फलंदाज दुखापतग्रस्त झाला. आता त्याची ही दुखापत किती गंभीर हे लवकरच कळेल.