| मुंबई | वृत्तसंस्था |
राज्यात मान्सूनचा जोर वाढणार आहे. येत्या काही दिवसात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
महाराष्ट्रात वेळाआधी दाखल झालेल्या मान्सूने दमदार आगमन करून विश्रांती घेतली होती. तर, महाराष्ट्रातील अनेक भागात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने नांगरणी करून तयार असलेला शेतकरी पेरणीच्या कामांसाठी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, हवामान खात्याने आज पुन्हा एकदा अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच, मान्सून संपूर्ण देशभरात सक्रिय होण्याची चिन्हेही दिसू लागली आहेत.
मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या भागांत आज मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या मुंबई डिव्हिजनने वर्तवली आहे. तर, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.