| रसायनी | प्रतिनिधी |
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर दिवसेंदिवस हल्ल्यांचे प्रमाण वाढत असून, आता पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राजकीय व्यक्तींकडून पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यानंतर आता पोलीस यंत्रणेतील काही कर्मचाऱ्यांकडूनही पत्रकारांना मारहाण होण्याच्या घटना समोर येत असल्याने लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवी मुंबई येथील महिला पत्रकार प्रिया खंडागळे यांच्याशी संबंधित मारहाणीच्या कथित घटनेचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याची तातडीने गडचिरोली येथे बदली करावी, पत्रकाराची जाहीर माफी मागावी आणि गृह विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे.
पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
