‌‘ट्रान्सपॉवर‌’मधील कामगारांच्या थकीत रकमेचा प्रश्न ऐरणीवर

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

175 पैकी 73 कामगारांचा मृत्यू; 25 वर्षांपासून कामगारांना न्यायाची प्रतीक्षा

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

ट्रान्सपॉवर इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीतील कामगारांच्या थकीत देणी आणि भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कंपनीतील सुमारे 175 कामगारांपैकी 73 कामगारांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या कुटुंबियांनाही अद्याप न्याय मिळालेला नसल्याचा आरोप ट्रान्सपॉवर कामगार संघटनेने केला आहे. या प्रकरणात लक्ष घालून कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष शांताराम हरी भोईर यांनी कामगारमंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात 17 जून 2026 रोजी कामगारमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. कंपनीच्या कामगारांच्या प्रश्नांवर यापूर्वी कामगार आयुक्त कार्यालयात अनेक बैठका झाल्या. मात्र, बैठकीतील निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. कामगार आयुक्तांकडून बैठकीचे इतिवृत्त पाठविण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात कामगारांच्या समस्यांवर ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Exit mobile version