टी-20 विश्‍वचषकचा आनंद होणार द्विगुणित

चित्रपटगृहांत केले जाणार टीम इंडियाच्या सामने प्रदर्शित
नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आयसीसी टी-20 विश्‍वचषक 2021 ओमान आणि यूएईच्या भूमीवर आयोजित केला जात आहे. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे, परंतु भारतीय संघाच्या जवळजवळ सर्व सामन्यांची तिकिटे विकली गेली आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हाला भारतात राहून टीम इंडियाचे सामन्याचा स्टेडियमप्रमाणेच आनंद लुटायचा असल्यास ते आता शक्य होणार आहे. कारण आता थिएटरमध्ये बसून तुम्ही मोठ्या पडद्यावर मॅचचा आनंद घेऊ शकता. मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआर सिनेमाने भारतीय चाहत्यांना ही मोठी बातमी दिली आहे. पीव्हीआर सिनेमासने पुष्टी केली की त्याला आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्ड कप

2021 च्या क्रिकेट सामन्यांचे थेट प्रदर्शन करण्याचे अधिकार मिळाले आहेत.
यंदाचा टी-20 विश्‍वचषक भारतात आयोजित केला जाणार होता. पण कोरोना महामारीमुळे आगामी आवृत्ती यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान खेळली जाणार आहे. पीव्हीआरने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, त्यांनी आयसीसी पुरुष टी-20 विश्‍वचषक 2021 च्या उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसह भारतीय सामन्यांच्या थेट प्रदर्शनासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी (आयसीसी) करार केला आहे. नवी दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबादसह 35 हून अधिक शहरांमधील 75 हून अधिक चित्रपटगृहांमध्ये सामने प्रदर्शित केले जातील, असे मल्टिप्लेक्सने सांगितले. पीव्हीआर लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्ता म्हणाले की, आयसीसीसोबतच्या सहभागाबद्दल त्यांना खूप आनंद झाला आहे कारण त्यांना विश्‍वास आहे की देशात क्रिकेट आणि चित्रपट एकमेकांना पूरक आहेत.

मोठ्या पडद्यामुळे आयसीसी पुरुष टी-20 विश्‍वचषकाचे कव्हरेज वाढवण्याची एक अनोखी संधी मिळते. क्रिकेट आणि चित्रपट एकमेकांना पूरक आहेत कारण भारतामध्ये ते देशाला जोडणारे दोन धर्म मानले जातात. चित्रपट आणि क्रिकेट पाहणे हा एक सामायिक मनोरंजनाचा अनुभव आहे व जेव्हा मोठ्या पडद्यावर येते तेव्हा स्टेडियमप्रमाणेच चाहत्यांची गर्दी होते, दत्ता म्हणाले. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. आणि दर्शकांसाठी हा एक वेगळा सामना आहे.

Exit mobile version