खालिस्तानी दहशतवाद्याला म्हटले शहीद


खालिस्तानी दहशतवाद्याला म्हटले शहीद

। अमृतसर । वृत्तसंस्था ।
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात निधन झालेला खालिस्तानी दहशतवादी जनरल सिंग भिंडरावाले याला हरभजन सिंग याने ङ्गशहीदफ म्हटल्यानंतर त्याच्यावर चोहोबाजूंनी टीका करण्यात आली आहे. दरम्यान, हरभजन सिंगने ङ्गऑपरेशन ब्लयू स्टारफच्या 37व्या जयंतीनिमित्त इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली होती. त्यानंतर हे सर्व घडले.

माफी मागितली
टीकेची झोड उठल्यानंतर हरभजन सिंगने सोशल साईटवर झाल्या प्रकरणी माफी मागितली. या वेळी तो म्हणाला, वॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड झालेला मेसेज मी विनाचेक शेअर केला. मी तो फोटो व त्यावरील मेसेजला सपोर्ट करीत नाही. माझ्याकडून चूक झाली. मला माफ करा. मी शीख असून हिंदुस्थानसाठीच लढीन. कोणत्याही राष्ट्रविरोधी बाबीला मी समर्थन करणार नाही.

Exit mobile version