गिरगावचा राजाची शाडूपासूनच निर्मिती

मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईच्या गणेशोत्सवा महत्व असलेल्या गिरगावच्या राजाची निर्मिती ही शाडू पासूनच केली जात आहे.गेल्या 94 वर्षांपासूनची ही परंपरा आजही पाळली जात आहे.23 फूट उंच अशी भव्यदिव्य मुर्ती दरवर्षी निर्माण केली जाते.पण आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने दिलेल्या नियमानुसार यंदा गिरगावच्या राजाची अवघी दोन फुटांची सुंदर मुर्ती बनविण्यात आली आहे.मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.यामध्ये रक्तदान,आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहे.शिवाय गरीब विद्यार्थ्यांना वह्या,पुस्तकांचे देखील वाटप करण्यात आले आहे.

Exit mobile version