गोवे रस्त्याला खड्डे व चिखलाचे साम्राज्य

विद्यार्थ्यांनासह, जेष्ठ नागरिक, कामगार वर्ग यांच्या जिवाला धोका
। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा हायवे वरून गोवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून या रस्त्याला पहिल्याच पावसात चिखल व खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले असून विद्यार्थ्यांसह जेष्ठ नागरिक, कामगार वर्ग यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

या मार्गावर गोवे येथे श्रीमती गिता द. तटकरे पॉलिटेक्निक कॉलेज,आय.टी.आय, बी. एस. सी, बी. कॉम, बी. ए कॉलेज असल्यामुळे येथे असंख्य विद्यार्थी प्रवास करीत असतात. तर गोवे येथील असंख्य विद्यार्थी द.ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाड येथे ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षक घेण्यासाठी येजा करीत असतात तसेच कोलाड येथे बाजारपेठेच्या ठिकाणी जाणारे असंख्य नागरिक व धाटाव औद्योगिक क्षेत्रात काम करण्यासाठी येजा करणारे असंख्य कामगार वर्ग याच मार्गावरून येजा करीत असतात. यामुळे या चिखलातून व खड्डयातून प्रवास करतांना टुव्हीलर गाड्या स्लिप होत आहेत.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गवरुन गोवे गावाकडे जाणारा रस्ता गेला आहे या रस्त्यात ५०० मिटरचा रस्ता पनवेल ते इंदापूर दरम्यान चौपरी करणात गेल्यामुळे या रस्त्याचे काम १२ वर्षे पुर्ण होऊनही पुर्ण होऊ शकले नाही या उलट या खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे गोवे गावाकडे जाणाऱ्या मार्गाला चिखल व खड्डयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे, यामुळे मार्ग काढतांना अनेक प्रवाश्यांच्या अंगावर चिखल उडत आहे तसेच टुव्हीलर गाड्या ही स्लिप होत आहेत. अशा वेळी रस्त्या तुला शोधू कुठे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन या मार्गाचे काम करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Exit mobile version