महामार्गावर कोसळलेली दरड हटविली

युध्दपातळीवर रस्ता केला चकाचक
| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी गावच्या हद्दीत रविवारी रात्री 10.30 च्या वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणाऱ्या तीनही लेन काही काळासाठी बंद करण्यात आली होती.रात्रीच्या 3 वाजेपर्यंत युध्दपातळीवर काम करीत 20 ते 25 डंपर लगदा उचलल्यात आला तर सोमवारी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत मुंबई लेन बंद ठेवून रस्त्यावरील लगदा उचल्यात आला आहे.मुसळधार पावसात दरड कोसळली मोठी दुर्घटना घडली असताना जिवीतहानी झाली नाही.

एक्सप्रेसवेवरील आडोशी गावच्या हद्दीत किमी 41.100 जवळ डोंगर भागातून दरड कोसळून मातीचा लगदा हा पुणे कडून मुंबई बाजूकडे जाणाऱ्या तीनही लेनवर पडल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तीनही लेनवरून वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्यात आली होती. सदरचा मातीचा लगदा हा आयआरबीचे जेसीबी व डंपरच्या सहाय्याने काढून घेण्याचे काम केल्यानंतर साधारण रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास दोन लेन सुरू करण्यात आल्या व वाहतूक सुरळीत करण्यात आली.साधारणतः 20 ते 25 डंपर लगदा रस्त्यावर पडलेला होता.दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

सदर घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्त टिम, आयआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दरड कोसळून रस्त्यावर आलेला मातीचा ढिगारा हटविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले.तर तीनही लेन बंद असल्यामुळे वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात खोपोली शहरातून वळविण्यात आली होती.

सोमवारी दुपारी येथील शिल्लक काम पूर्ण करण्यासाठी दुपारी 12 ते 2 या काळात वाहतूक बंद करण्यात आली होती त्यामुळे पुन्हा एकदा पुणे – मुंबई जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळाले.या दरम्यान फक्त कार साठी जुना पुणे मुंबई महामार्ग शींग्रोबा घाटातून सुरू ठेवण्यात आला असल्याचे बोरघाट पोलिस केंद्राचे स.पो.नि.योगेश भोसले यांनी सांगितले.

Exit mobile version