धाकटीजुई, बोरखारमध्ये आघाडीचा झंझावात

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील जासई जिल्हा परिषद गटातील धाकटीजुई व बोरखारमध्ये काँग्रेस, शिवसेना, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे महाविकास आघाडीचे जिल्हा परिषद उमेदवार डॉ. मनिष पाटील व चिर्ले पंचायत गणातील उमेदवार प्रियांका मढवी यांचा झंझावात प्रचार दौरा काढण्यात आला. या विभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला असल्याने या निवडणुकीच्या प्रचाराला अधिक वेग आला आहे. फेब्रुवारी 2007 च्या जासई जिल्हा परिषद गटातून डॉ. मनिष पाटील यांनी सर्व पक्ष विरोधात असताना एका काँग्रेस पक्षाच्या ताकदीवर आणि स्वतःच्या लोकप्रियतेवर विजय मिळविला होता. या प्रचार दौऱ्यात बी.एम. ठाकूर, रामकृष्ण नवाळे, हसुराम घरत, एकनाथ घरत, प्रकाश जोशी, मयूर पाटील, विलास घरत, शक्ती म्हात्रे, संदेश घरत, नशीब साळवी, दीपक घरत, हसुराम पाटील, संतोष घरत, सनी घरत, पंकज घरत आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version