| माणगाव | प्रतिनिधी |
जे.बी. सावंत एज्युकेशन सोसायटीच्या टिकमभाई मेथा वाणिज्य महाविद्यालय माणगावमध्ये राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त सोमवारी (दि.12) कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा न्यायाधीश वर्ग एक अतिरिक्त सत्र न्यायाधीश माणगाव संजीव तुकाराम भालेराव उपस्थित होते. त्यांनी आपल्या वक्तव्यातून राष्ट्रीय युवा दिनानिमित्त वेगवेगळ्या कायद्याविषयी माहिती देऊन विविध उदाहरणांच्या माध्यमातून उपस्थित सर्व युवांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे सदस्य अधिवक्ता अॅड. रोशन पांढरे यांनी रस्ते वाहतूक, मतदान तसेच युवकांसाठी असणाऱ्या विविध कायद्यांची माहिती देताना स्वामी विवेकानंद यांच्या कार्यातून युवकांसाठीची प्रेरणा आणि आजचा युवक यांची सांगड घालून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रा. अशोक मोरे यांनी आलेल्या अतिथींना महाविद्यालयाविषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमास जे. बी. सावंत एज्युकेशन सोसायटी माणगावचे सेक्रेटरी नानासाहेब सावंत, माणगाव वकील संघटना अध्यक्ष मोहन मेथा, वकील संघटनेचे उपाध्यक्ष पुंडलिक तुकाराम मालोरे, सहसचिव अॅड. सुजित मेहता, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री जाधव यांनी केले.






