कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट एकची लांबी वाढणार

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकची लांबी कमी असल्याने जास्त डबे असलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या दोन वेळा थांबतात. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याबाबत पंकज ओसवाल यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली असता या फलाटाची लांबी मार्च 2024 पर्यंत वाढविण्यात येणार आहे असे लेखी उत्तर देण्यात आले आहे.

रेल्वे स्थानकावर एकूण तीन फलाट व एक इएमयु फलाट आहे. फलाट क्रमांक एक वर मुंबईहून पुण्याकडे जाणार्‍या गाड्या येत असतात. परंतु या फलाटाची लांबी कमी असल्यामुळे जास्त डबे असलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या दोन वेळा थांबविल्या जातात. त्यामुळे प्रवास करणा-या प्रवाशांची खूप धावपळ होते. या गडबडीत अपघात होण्याची शक्यता असते. नुकतेच कर्जत रेल्वे स्थानकावर डब्याची स्थिती दर्शविणारे छोटे इंडिकेटर्स बसविण्यात आले आहेत. दोन वेळा गाडी थांबत असल्याने रेल्वे प्रशासनाला एकाचं ठिकाणी डबे दर्शविणारे दोन इंडिकेटर्स बसवावे लागले आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होतो.

या होणार्‍या त्रासाबद्दल कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनीं रेल्वे प्रशासना कडे विचारणा केली असता रेल्वे प्रशासनाने सदर फलाट ची लांबी वाढविण्याचे काम मार्च 2024 पर्यंत करण्यात येणार असल्याचे ओसवाल यांना कळविले आहे.

Exit mobile version